
नवी दिल्ली : पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले असून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. भारताच्या ॲक्शननंतर पाकिस्तानला मोठी धडकी भरली आहे. पाकिस्तानने देखील एलओसीवर फायरिंग केली. ज्यामध्ये 3 लोकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानी मोर्टार शेलिंगमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती पुंछ जिल्हा अधिकाऱ्यांनी केली आहे. भारतीय लष्करानेही याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. ज्यामध्ये पाकिस्तानी सैन्याचेही मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सद्याची परिस्थिती पाहाता जम्मू, सांबा, कठुआ, राजौरी आणि पूंछ येथील सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था आज बंद राहतील. पाकिस्तान आपल्या नापाक कारवाया थांबवण्याची कोणतीही चिन्हे दाखवत नाहीत. भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्याचा प्रयत्न करत आहे, तर घाबरलेल्या पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर पुन्हा गोळीबार केला.
जम्मू आणि काश्मीरच्या समोरील नियंत्रण रेषेवरील आणि आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानी सैन्याने अंदाधुंद गोळीबार केला, ज्यामध्ये तोफखान्याचा माराही समावेश होता. या अंदाधुंद गोळीबारात तीन निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले.
याआधीही पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान सातत्याने युद्धबंदीचे उल्लंघन करत आहे, ज्याला भारत चोख प्रत्युत्तर देत आहे. पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पूंछ-राजौरी सेक्टरमधील भिंबर स्ट्रीट आणि कुपवाडा जिल्ह्यातील कर्नह भागात गोळीबार केला.
Belgaum Varta Belgaum Varta