
नवी दिल्ली : भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकली आहे. बिथरलेल्या पाकिस्तानच्या सैन्याने आता सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आणि भारतीय सैन्यावर गोळीबार केला. त्यामध्ये १० भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. भारताने दिलेल्या प्रत्युत्तरामध्ये देखील १० पाकिस्तानी जवान ठार झाले आहेत.
पहलगाम हल्ल्याचा बदला घेऊन भारताने पाकिस्तानच्या नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केला. त्यानंतर सीमेवर परिस्थिती चिघळू नये अशी इच्छा आहे. परंतु पाकिस्तानने तणाव वाढवला तर त्याला निर्णायक उत्तर देणार असल्याचे भारताने आधीच स्पष्ट केलं आहे. आताही सीमेवर पाकिस्ताने केलेल्या गोळीबाराला उत्तर देताना भारताने पाकिस्तानच्या १० जवानांना ठार केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta