Monday , December 8 2025
Breaking News

भारताचा लाहोर, बहावलपूरमध्ये ड्रोन हल्ला

Spread the love

 

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. भारताच्या जम्मू, जैसलमेर आणि अमृतसरमध्ये पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचे प्रयत्न भारताने हाणून पाडले आहेत. भारताच्या हवाई सुरक्षा प्रणालीने जम्मूमधील अनेक ड्रोन नष्ट केले आहेत. यानंतर भारताने आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताने पाकिस्तानातील लाहोरमध्ये ड्रोन हल्ला केला आहे.

भारताने पाकिस्तानच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या लाहोरवर ड्रोन हल्ला केला आहे. भारताकडून हवाई हल्ले चढवण्यात आले आहे. लाहोर शहरातील डिफेन्स सिस्टीम भारताने खाक केली आहे. या हल्ल्यांनंतर लाहोरमध्ये तातडीने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. भारताने लाहोरमध्ये अनेक ठिकाणी हल्ले केले जात आहे.

भारतीय जवानांकडून ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर
पाकिस्तानाकडून रात्री ९ च्या आसपास जम्मू आणि आसपासच्या भागात ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पाकिस्तानने जम्मूच्या आरएसपुरा आणि अरनिया सेक्टरमध्ये घुसखोरी करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय जवानांनी तो त्वरित उधळून लावला. त्यानंतर राजौरी आणि पुंछमध्येही पाकिस्तानने हल्ल्याचा प्रयत्न केला, पण भारतीय जवानांनी त्यांना चोख उत्तर दिले. पाकिस्तान या कुरापतीमुळे जम्मू, काश्मीर, लेह, पंजाबमधील अमृतसर शहरात रात्री ९:०० ते सकाळी ५:०० पर्यंत वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यासोबतच पंजाबच्या सीमावर्ती भागांमध्येही ब्लॅकआऊट लागू करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

रूग्णवाहिकेने घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू

Spread the love  अहमदाबाद : रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *