
नवी दिल्ली : एकीकडे भारत पाकिस्तानात घुसून कारवाई करत असताना दुसरीकडे पाकिस्तानी सैन्याला बलोच लिबरेशन आर्मीने घेरले आहे. बलोच आर्मीने जवळपास पाकिस्तानच्या एक तृतीयांश भागावर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला. केच, मस्टंग आणि कच्छीमधून बलोच आर्मीने पाकिस्तानला पळवले. तसेच बहुतांश भागात पाकचे झेंडे काढून बलोच आर्मीने त्यांचे झेंडे फडकावले आहेत. कालच सकाळी बलोच आर्मीने आयईडी ब्लास्ट करून, पाकिस्तानच्या 14 सैनिकांना यमसदनी पाठवल्याचे समोर आले होते. याआधी याचवर्षी मार्च महिन्यात याच बलोच आर्मीने जाफर एक्स्प्रेसचं अपहरण करून पाकिस्तानच्या नाकी नऊ आणले होते.
बलोचांनी पाकिस्ताने अनेक कॅम्पदेखील नेस्तनाबूत केले
बलुचिस्तान प्रांताची राजधानी असलेल्या क्वेट्टावरीलही नियंत्रण पाकिस्तानने गमावल्याची माहिती आहे. बलोच लिबरेशन आर्मीने क्वेट्टामधील पाकिस्तानी लष्कराच्या छावण्यांवर मोठे हल्ले केले आहे. पाकिस्तान सैनिकांवर गोळीबार आणि बॉम्बहल्ला करत बीएलएने क्वेटा ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय बलोचांनी पाकिस्ताने अनेक कॅम्पदेखील नेस्तनाबूत केलेत. पाकिस्तान आता सर्व बाजूंनी वेढला गेल्याचे पाहायला मिळत आहे.
बलुचिस्तान पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हान ठरू शकतो
बलुचिस्तान हे पाकिस्तानच्या दक्षिण-पश्चिम भागातील सर्वात मोठे, पण तुलनेने कमी लोकसंख्या असलेले प्रांत आहे. या प्रांताचे क्षेत्रफळ सुमारे 347,190 चौ.किमी असून, ते पाकिस्तानच्या एकूण भूभागाच्या सुमारे 44% आहे. बलुचिस्तानमध्ये बलुच लिबरेशन आर्मी सारख्या गटांनी पाकिस्तानपासून स्वतंत्रतेसाठी सशस्त्र संघर्ष सुरू केला आहे. या संघर्षात अनेकदा सुरक्षा दलांवर आणि परदेशी नागरिकांवर हल्ले होतात. 6 मे 2025 रोजी कच्छी जिल्ह्यातील रस्त्याच्या कडेला लावलेल्या बॉम्बस्फोटात 7 सैनिक ठार झाले, ज्याचा आरोप बीएलएवर ठेवण्यात आला. बलुचिस्तानचा भौगोलिक, आर्थिक आणि राजकीय महत्त्वामुळे तो पाकिस्तानसाठी अत्यंत संवेदनशील प्रांत मानला जातो. येथील अस्थिरता आणि स्वतंत्रतेच्या मागण्या भविष्यातही पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हान ठरू शकतात.
Belgaum Varta Belgaum Varta