
आंध्र प्रदेशातील द्वारपुडी गावात एक भयानक घटना घडली. कारमध्ये खेळत असताना गुदमरून चार मुलांचा मृत्यू झाला. उदय (8), चारुमती (8), करिष्मा (6) आणि मनस्वी (6) अशी मृतांची नावे आहेत. चारुमती आणि करिष्मा बहिणी आहेत, तर इतर दोघी त्यांच्या मैत्रिणी आहेत.
द्वारपुडी गावातील चार मुली उन्हाळी सुट्टीचा आनंद घेत होते, रविवारी सकाळी खेळण्यासाठी कारमध्ये गेले. सेंट्रल लॉकिंगमुळे कार लॉक झाली. काही वेळाने मुलांना श्वसनाची समस्या निर्माण झाल्याने गुदमरून तिथेच मृत्यू झाला.
पालकांनी शोध घेतला असता मुले सापडली नाहीत. शेवटी पालक गाडीजवळ पोहोचले तेव्हा त्यांना दिसले की मुले बेशुद्ध पडली होती.
Belgaum Varta Belgaum Varta