
पंचकूला : हरियाणाच्या पंचकूलामध्ये एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. एका कुटुंबाने कारमध्ये बसून विष प्राशन करुन आपले जीवन संपवले. पोलिसांनी सात मृतदेह ताब्यात घेतले आहेत. आजोबा, आई-वडिल आणि मुलांचा मृत्यू झाला आहे. सर्व सातही मृतदेहांच पोस्टमार्टम करण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. विष प्राशन करुन आत्महत्या करणारे हे कुटुंब उत्तराखंडच असल्याच सांगितले जात आहे. पंचकूलामध्ये हे कुटुंब रहायचे. मृतांमध्ये एक जोडपं, त्यांची तीन मुले आणि कुटुंबातील वृद्धांचा समावेश आहे.
रात्री 11 वाजता पोलिसांना एक फोन आला. कॉलरने सांगितले की, एक कार पंचकूलाच्या सेक्टर-27 मध्ये उभी आहे. त्यात काही लोकांनी आत्महत्या केली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले. मृतदेह कारमधून काढून पंचकूलाच्या सेक्टर 26 येथील एका खासगी रुग्णालयातील शवागरात ठेवण्यात आले आहेत. सर्व मृतदेहांच पोस्टमार्टम होईल. कारमध्ये 7 जण होते. डॉक्टरांनी सर्वांना मृत घोषित केले आहे. रुग्णालयात आणण्याआधीच सर्वांनी प्राण सोडले होते. मृतकांची ओळख पटली आहे. देशराज मित्तल आणि प्रवीण मित्तल अशी त्यांची नाव आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta