
मुरादाबाद : उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने माकडांना घाबरवण्यासाठी कुऱ्हाड फेकून मारली. मात्र, ही कुऱ्हाड माकडांना लागण्याऐवजी चुकून त्यांच्या दोन वर्षांच्या मुलाला लागली आणि त्यात मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
या २ वर्षांच्या मुलावर माकडे हल्ला करतील अशी भिती वडिलांना होती. त्यामुळे त्यांनी माकडांना पळून लावण्यासाठी जवळ पडलेली कुऱ्हाड फेकून मारत माकडांना पळून लावण्याचा प्रयत्न केला. पण वडिलांनी माकडांवर फेकलेली कुऱ्हाड मुलाला लागली आणि त्यामध्ये मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत संबंधित व्यक्तीच्या मेहुण्याने गंभीर आरोप केला आहे. मुलाच्या वडिलांनी रागाच्या भरात मुलाची हत्या केल्याचा दावा मेहुण्याने केला आहे.
दरम्यान, लखन यांचे मेहुणे जितेंद्र यांनी आरोप केला की हा अपघात नाही तर खून होता. जितेंद्र यांच्या मते लखनने त्याची पत्नी अनिताशी झालेल्या भांडणानंतर रागाच्या भरात ही हत्या केली आहे. तसेच तिलाही मारहाण केल्याचा दावा जितेंद्र यांनी केला आहे. भांडणाच्या वेळी लखनने आरवला घेऊन जात ठार केल्याचा संशय त्यांना असल्याचे वृत्तात म्हटले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta