Sunday , December 7 2025
Breaking News

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतदान केंद्रांवरील सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करा : राहुल गांधी यांची मागणी

Spread the love

 

नवी दिल्ली : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज एका लेखात, गेल्या वर्षी महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता. यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने याला उत्तर देत राहुल गांधी यांचे आरोप हास्यास्पद असल्याचे स्पष्टीकरण दिले होते.

आता राहुल गांधी यांनी यावर निवडणूक आयोगाला प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, निवडणूक आयोगाचा गंभीर प्रश्नांची उत्तरे देण्याचा हा योग्य मार्ग नाही. हे एक टाळाटाळ करणारे विधान आहे. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला आव्हान दिले आहे की, जर त्यांच्याकडे लपवण्यासारखे काही नसेल तर त्यांनी त्यांचे दावे सिद्ध करावेत आणि लेखातील प्रश्नांची उत्तरे पुराव्यांसह द्यावीत.

सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करण्याची मागणी
राहुल गांधी निवडणूक आयोगाने दिलेल्या उत्तरानंतर आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, “निवडणूक आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे. त्यामुळे तुम्ही स्वाक्षरी नसलेल्या आणि माहिती देण्याची टाळाटाळ करणाऱ्या पत्रकांचे माध्यमांमार्फत वितरण करणे, हा गंभीर प्रश्नांना उत्तर देण्याचा योग्य मार्ग नाही. आपल्याला काहीही लपवायचे नसेल, तर माझ्या लेखातील प्रश्नांची थेट उत्तरे द्या. यासोबतच, लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी एकत्रित, डिजिटल आणि मशीन-रिडेबल मतदार यादी प्रकाशित करा. तसेच, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतदान केंद्रांवरील संध्याकाळी ५ नंतरचे सर्व सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करा. टाळाटाळ केल्याने विश्वासार्हता टिकून राहणार नाही. सत्य सांगितल्यानेच ती दृढ होईल.”

राहुल गांधींचे आरोप
शनिवारी, ७ जून रोजी इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या लेखात, राहुल गांधी यांनी महाराष्ट्र निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता. निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या पॅनेलमध्येही गैरप्रकार झाला होता. महाराष्ट्र निवडणुकीत तात्पुरत्या आणि अंतिम मतदानात ७ टक्क्यांहून अधिक फरक होता. असे यापूर्वी कधीही घडले नव्हते. एक्सवर लेख शेअर करताना, राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीप्रमाणे बिहार निवडणुकीतही मॅच फिक्सिंग होऊ शकते.

About Belgaum Varta

Check Also

रूग्णवाहिकेने घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू

Spread the love  अहमदाबाद : रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *