
कोलंबियात २०२६ मध्ये होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. विरोधी कंझर्व्हेटिव्ह डेमोक्रॅटिक सेंटर पक्षाचे नेते आणि राष्ट्रपतीपदाचे उमेदवार मिगुएल उरिबे यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. ही घटना दिवसाढवळ्या बोगोटा शहरातील निवडणूक सभेदरम्यान घडली. उरिबे रॅलीदरम्यान, जनतेला संबोधित करत होते. यावेळी अज्ञात हल्लेखोराने त्यांच्या मागून गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर त्यांना तातडीने रूग्णालयात नेण्यात आले असून, आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
कोलंबियात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नेत्यांनी कंबर कसली आहे. रॅली आणि प्रचार सुरू आहेत. मिगुएल उरीबे यांनी बोगोटा येथे निवडणूक रॅली काढली होती. या रॅलीदरम्यान ते जनतेला संबोधित करत होते. संबोधित करीत असताना एका अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर मागून गोळ्या झाडल्या आणि पसार झाला.
स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, उरिबे यांना तीन गोळ्या लागल्या असून, त्यापैकी एक गोळी त्यांच्या डोक्याला लागली आहे. उरिबे यांचे रक्ताने माखलेले व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहे. यात त्यांच्या डोक्याला झालेली जखम दिसत आहे. यानंतर त्यांना तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याकारणाने त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, संशियत हल्लखोराला अटक केल्याची माहिती बगोटाचे मेयर कार्लोस गॅलन यांनी दिली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta