Sunday , December 7 2025
Breaking News

लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, भरधाव ट्रकची कारला धडक; ९ जणांचा जागीच मृत्यू

Spread the love

 

पुरुलिया : पश्चिम बंगालच्या पुरूलिया-जमशेदपूर राष्ट्रीय महामार्ग- १८ वर आज पहाटे भीषण रस्ते अपघातात झाला असून यामध्ये ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झालेले सर्वजण लग्न समारंभ आटपून घरी परत जात होते. अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुरुलिया-जमशेदपूर टाटा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १८ वर शुक्रवारी पहाटे हा अपघात झाला. बलरामपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नामसोल प्राथमिक शाळेजवळ ही घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चुराडा झाला. कारमधील ९ जण पुरुलियाहून झारखंडकडे जात असल्याचे सांगण्यात येत आहे. कारने बरमपूरहून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये सर्वजण गंभीर जखमी झाले होते. या सर्वांना स्थानिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. या ९ जखमींना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
कारमधील सर्वजण लग्न समारंभातून परतत होते. अपघातग्रस्त कार पुरुलियाहून बलरामपूरला जात होती. त्याचवेळी कार अनियंत्रित झाली आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला तिने धडक दिली. कारला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रक देखील अनियंत्रित झाला आणि जवळच्या भातशेतीत जाऊन उलटला. अपघाताची माहिती मिळताच बलरामपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व जखमींना पोलिसांनी रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषीत केले.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमध्ये असणारे सर्वजण पुरुलियाच्या बाराबाजार पोलिस स्टेशन हद्दीतील अदाबाना गावातून झारखंडच्या निमडीह पोलिस स्टेशन हद्दीतील तिलैतान या गावात जात होते. हे सर्वजण बोलेरोमधून प्रवास करत होते. ही गाडी अचानक अनियंत्रित झाली आणि तिने भरधाव ट्रकला धडक झाली. ही टक्कर इतकी भीषण होती की गाडीचा चुराडा झाला. पोलिसांनी गाडीतून मृतदेह बाहेर काढणे देखील कठीण झाले होते.

About Belgaum Varta

Check Also

रूग्णवाहिकेने घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू

Spread the love  अहमदाबाद : रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *