
बक्सर : बिहारमधील बक्सरमध्ये गंगा नदीवर अपघाताची भयंकर घटना घडली. नदीवरील पुलाचे कठडे तोडून भरधाव वेगात आलेली स्कार्पियो कार थेट नदीमध्ये कोसळली. कारमधील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री वीर कुंवर सिंह पुलावर ही अपघाताची घटना घडली. गंगा नदीवर रात्रीपासून बचावकार्य सुरू आहे. कारमधील एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून इतरांचा शोध घेतला जात आहे.
बिहारहून उत्तर प्रदेशच्या दिशेने जाणारी स्कॉर्पिओ कार शुक्रवारी रात्री गंगा नदीवरील पुलाच्या कठड्याला धडकून नदीत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. ही घटना शुक्रवारी रात्री ८:३० च्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षदर्शींनुसार, या कारमध्ये पाच ते सहा जण होते. परंतु कारमध्ये नेमके किती प्रवासी होते याची अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. तसेच, हे प्रवासी कोठून येत होते याबाबतही माहिती समजू शकलेली नाही.
बक्सरमधील अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले आहे. स्थानिकांच्या मदतीने गंगा नदीत बुडालेल्या स्कॉर्पिओचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अपघातामधील एका व्यक्तीचा मृतदेह मिळाला आहे. इतरांचा शोध घेतला जात आहे.

Belgaum Varta Belgaum Varta