
जोधपूर : २०१३ च्या बलात्कार प्रकरणात तुरुंगात असलेल्या स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापूला जोधपूर न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
२०१३ मध्ये आसारामला त्याच्या जोधपूर आश्रमात १६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते. जोधपूरच्या ट्रायल कोर्टाने ८६ वर्षीय आसाराम बापूला आयपीसीच्या कलम ३७६, पोक्सो कायदा आणि बाल न्याय कायद्याअंतर्गत दोषी ठरवले होते. आसारामला ऑगस्ट २०१३ मध्ये अटक करण्यात आली होती आणि सप्टेंबरमध्ये जोधपूरला आणण्यात आले होते.
आता, खंडपीठाने त्यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला आहे आणि तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांच्या अनुयायांना भेटू नये असे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने म्हटले आहे की, ८६ वर्षीय आसाराम यांना हृदयरोग आणि वयाशी संबंधित आरोग्य समस्या आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta