
मध्य आफ्रिकन रिपब्लिकच्या राजधानीतील एका शाळेत गुरुवारी स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत २९ मुलांचा मृत्यू झाला. तर २६० जण जखमी झाले. बुधवारी बांगुई येथील बार्थेलेमी बोगांडा हायस्कूलच्या कॅम्पसमध्ये एका बिघाड झालेल्या ट्रान्सफॉर्मरला वीजपुरवठा केला जात असताना हा स्फोट झाला.
आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, स्फोटानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत १६ विद्यार्थिनींसह बहुतेक बळींचा जागीच मृत्यू झाला, तर काहींचा रुग्णालयात मृत्यू झाला. मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, किमान २६० लोक जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेच्या वेळी सुमारे ५,००० विद्यार्थी परीक्षेला बसण्यासाठी शाळेत उपस्थित होते. त्याचवेळी वीजपुरवठा करण्यात येत होता, तेव्हा स्फोट झाला. त्यामुळे परीक्षार्थींमध्ये घबराट पसरली. भीतीमुळे विद्यार्थी धावपळ सुरू झाली. या धावपळीत चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेबाबत एका विद्यार्थ्याने माध्यमांशी बोलताना आपबीती सांगितली.
दरम्यान अधिकाऱ्यांनी अद्याप बळींची नेमकी संख्या जाहीर केलेली नाही. निवेदनानुसार, शाळेतील दोन्ही परीक्षा केंद्रांवर एकूण ५,३११ उमेदवार उपस्थित होते. दोन रुग्णालयांमधून मिळालेल्या माहितीनुसार, तात्पुरत्या मृतांची संख्या किमान १० आहे, तर अनेक जण गंभीर जखमी आहेत.
घटनेची परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जातील आणि उर्वरित परीक्षा सत्र पुन्हा सुरू करण्याची तारीख पुढील निवेदनात जाहीर केली जाईल, असे मंत्रालयाने पुढे म्हटले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta