
तेलंगणात राज्यातील भाजपचा फायरब्रँड नेता आणि आमदार टी राजा यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष जी किशन रेड्डी यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला आहे. पक्षांतर्गत वादाची या राजीनाम्यालादिल्याचे समजते.
टी राजा सिंह यांनी पक्षांतर्गत वादातून भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे बोलले जाते. ते गोशामहलमधून भाजपचे विधानसभेवर प्रतिनिधित्व करत होते. तेलंगणा भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास ते इच्छुक होते, असेही सांगितले जात आहे. तेलंगणाचे भाजप अध्यक्ष जी किशन रेड्डी यांच्याकडे त्यांनी राजीनामा दिला आहे. मी प्रचंड निराश असून हे पत्र लिहित आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार रामचंद्र राव हे तेलंगणा भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात, अशी माहिती मिळाली. हा निर्णय माझ्यासाठी धक्कादायक होता. हा धक्का केवळ माझ्यासाठीच नाही, तर माझ्यासोबत आस्थेने नेहमी उभ्या असणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांना आहे. मात्र, आज ते सर्व हताश आहेत, असं त्यांनी राजीनाम्यात नमूद केले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta