
अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/
——————————————————————
—————————————————————–
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात १८ दिवस राहिल्यानंतर आज (१५ जुलै) भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह चारही अंतराळवीर पृथ्वीवर सुखरुप परतले आहेत. ‘ॲक्सिओम-४’ या अंतराळ मोहिमेतील सदस्य १८ दिवस आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात राहिले आहेत. त्यानंतर चारही अंतराळवीर अंतरराष्ट्रीय स्थानकामधून सोमवारी (१४ जुलै) भारतीय वेळेनुसार सायंकाळी ४.५० वाजता पुन्हा पृथ्वीवर येण्यासाठी परतीच्या प्रवासाला निघाले होते.
त्यानंतर आज (१५ जुलै) शुभांशू शुक्ला यांच्यासह चारही अंतराळवीरांचं अंतराळयान कॅलिफोर्नियातील एका समुद्रात लँडिंग झालं आहे. हे चारही अंतराळवीर पृथ्वीवर सुखरुप परतले आहेत. त्यानंतर आता या अंतराळवीरांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या सर्वांनी ही मोहीम यशस्वी पार पडल्याबद्दल आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
शुभांशू शुक्ला यांच्या आई-वडिलांना आनंद अश्रू
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात १८ दिवस राहिल्यानंतर आज भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह चारही अंतराळवीर पृथ्वीवर सुखरुप परतल्यानंतर त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. तसेच यावेळी शुभांशू शुक्ला यांच्या आई-वडिलांना आनंद अश्रू अनावर झाल्याचंही पाहायला मिळालं.
Belgaum Varta Belgaum Varta