
पणजी : अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत शिवोली येथे ४२९.३ ग्रॅम चरस जप्त केला असून बेंगळुरू येथील राजन सेट्टियार (वय ३२) याला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. या चरसची आंतरराष्ट्रीय बाजारमूल्य अंदाजे ४.३० लाख रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बंगळुरू येथील रहिवासी राजन सेट्टियार शिवोली येथे राहत होता. राजन याला संशयित काळसर रंगाच्या चरससह रंगेहाथ पकडण्यात आले.
अंमली पदार्थ जप्त करून त्याच्या विरोधात एन्डीपीएस कायदा १९८५ च्या कलम २० (ब) (ii) (ब) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईचे नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक गिरीश पाडलोस्कर यांनी केले.
छापेमारी करणाऱ्या पथकात पोलिस कॉन्स्टेबल अक्षय नाईक, वेंकटेश माईंणकर, योगेश मडगावकर, तुषार परवार, देवराज नाईक आणि महिला कॉन्स्टेबल सीमा अर्पारकर यांचा समावेश होता.
या प्रकरणाचा पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गिरीश पाडलोस्कर करत असून, पोलिस उपअधीक्षक नेर्लोन अल्बुकर्क आणि पथकाचे पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Belgaum Varta Belgaum Varta