हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर रविवारी सकाळी ही चेंगराचेंगरीची घटना घडली. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
“हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात प्रचंड गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. मी घटनास्थळाकडे जात आहे. या घटनेच्या सविस्तर अहवालाची प्रतिक्षा आहे,” असे गढवाल डिव्हिजनचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी सांगितले.
आयजी कायदा आणि सुव्यवस्था, निलेश भारणे यांनी सांगितले की, भाविक मंदिराकडे जात असताना ही घटना रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. “तेथे विजेचा धोका असल्याबद्दल अफवा पसरली, त्यामुळे भाविकांमध्ये भीती पसरली आणि ही परिस्थिती उद्भवली. आम्ही कारणांचा तपास करत आहेत आणि बचावकार्य सुरू आहे,” असे त्यांनी सांगितले.
मनसा देवी मंदिर हे हरिद्वारच्या पाच पवित्र स्थळांपैकी एक मानले जाते पंच तीर्थांपैकी एक म्हणून येथे अनेक भाविक दर्शनासाठी येतात. हे मंदिर शिवालिक हिल्स येथे ५०० फूटांपेक्षा जास्त उंचीवर आहे.
Belgaum Varta Belgaum Varta