Sunday , December 7 2025
Breaking News

दर्ग्याची भिंत कोसळली; 5 जणांचा मृत्यू

Spread the love

 

नवी दिल्ली : दिल्लीतील निजामुद्दीन येथील हुमायू येथील मकबऱ्याजवळ भीषण दुर्घटना घडली आहे. दर्गा शरीफ फत्ते शाहच्या आतील खोलीतील भिंत अचानक कोसळली. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. भिंतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

दिल्लीच्या अग्निशमन दलाचे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज शुक्रवारी दुपारी ३ वाजून ५१ वाजता दर्ग्याची भिंत कोसळल्याची घटना घडली. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ५ जवान घटनास्थळी पोहोचले. जवानांनी तातडीने बचाव कार्य सुरु केलं. जवानांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली.

भिंत कोसळून मृत्यू झालेल्या नागरिकांमध्ये ३ महिला आणि २ पुरुषांचा समावेश आहे. तर दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी आतापर्यंत ११ जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढलं. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली ६ ते ७ जण ढिगाऱ्याखाली दबल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

रूग्णवाहिकेने घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू

Spread the love  अहमदाबाद : रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *