राजनांदगाव : छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यातील चिरचरी गावाजवळ भीषण अपघात घडला. या अपघातात सहा मित्रांचा जागीच मृत्यू झाला. तर, कारचालक गंभीर जखमी आहे. इंदूरमधील सहा मित्र उज्जेनला भेट देऊन ओडिशाच्या दिशेने जात होते. परंतु, चिरचरी राष्ट्रीय महामार्ग क्राँसिंगजवळ कारचा भीषण अपघात झाला. कार दुभाजक तोडून समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. यामुळे कारचा चक्काचूर झाला. तसेच कार एका बाजूने पूर्णपणे तुटली.
या भीषण अपघातात कारमध्ये असलेल्या सहा मित्रांचा मृत्यू झाला. तर, चालक गंभीर जखमी आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरीक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच कारमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. प्रवाशांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी ६ मित्रांचा अपघातात मृत्यू झाल्याचे सांगितले. सध्या कार चालकावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या भीषण अपघातात आकाश मौर्य, गोविंद, अमन राठोड, नितीन यादव, संग्राम केशरी आणखी एकाचा मृत्यू झाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. तर, चालक सागर यादव गंभीर जखमी आहे. सर्वजण इंदौर येथील रहिवासी होते.

Belgaum Varta Belgaum Varta