नवी दिल्ली : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी इंडिया आघाडीकडून उपरराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराच नाव जाहीर केले. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील. त्यांच्यासमोर भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सीपी राधाकृष्णन यांचे आव्हान आहे.
इंडिया आघाडीने पत्रकार परिषद घेऊन सुदर्शन रेड्डी यांचे नाव उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले. काँग्रेस प्रवक्त्याने सांगितले की, सर्व पक्षाच्या सहमतीने त्यांचे नाव फायनल केल. आम आदमी पार्टीची सुद्धा सुदर्शन रेड्डी यांच्या नावाला सहमती आहे, असं टीएमसी खासदार डेरेक ओ’ब्रायन यांनी सांगितले.
कोण आहेत बी सुदर्शन रेड्डी?
बी सुदर्शन रेड्डी यांचा जन्म 8 जुलै 1946 रोजी झाला. ते भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत. गोव्याचे ते पहिले लोकायुक्त होते. सुदर्शन रेड्डी यांचा जन्म आंध्र प्रदेशच्या रंगा रेड्डी जिल्ह्यात अकुला मायलारम गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. सुरुवातीच्या शिक्षणानंतर त्यांनी हैदराबादच्या उस्मानिया यूनिवर्सिटीमधून 1971 साली लॉ ची पदवी घेतली.
Belgaum Varta Belgaum Varta