भोपाळ : भारताच्या लोकशाहीची ताकद फक्त संसद आणि विधानसभांवर मोजली जात नाही. तर लोकशाहीची खंबीरता ही, चौथ्या स्तंभात अर्थात पत्रकारितेत दडलेली आहे असे प्रतिपादन मध्यप्रदेशचे ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर नवीन जोशी यांनी बोलताना केले आहे.
जनता आणि शासन यांच्यामध्ये संवाद साधण्याचे धुव्याचे काम पत्रकार करीत असतात.परंतू दुर्दैवाची बाब म्हणजे विशेषतः ग्रामीण भागात काम करणाऱ्या पत्रकारांना जेव्हा सरकारी कार्यालयांच्या दाराशी जावे लागते, तेव्हा त्यांना उपेक्षा आणि अपमान सहन करावा लागतो.
क्लार्कपासून कलेक्टर आणि कमिश्नरपर्यंत अनेक अधिकारी या गोष्टीचा फायदा घेतात की बहुसंख्य पत्रकारांना “जनतेबद्दल त्यांचे कायदेशीर आणि घटनात्मक कर्तव्य” याची सखोल माहिती नसते. परिणामतः
कधी त्यांना कायद्याचे भय दाखवून घाबरवले जाते तर कधी निवेदन स्वीकारण्यास नकार दिला जातो. कधी भ्रष्टाचार आणि वाईट कृत्यांची प्रकरणे दडपून त्यांचे प्रयत्न निष्फळ केले जातात.
पत्रकारितेचा हा संघर्ष खूप वर्षां पासून सुरू आहे. पत्रकाराची लेखणी नेहमीच समाजातील अन्याय, विषमता आणि उदासीनतेचा सामना करत आहेत.परंतु आता चित्र बदलत आहे.
ब्रह्मास्त्राच्या रूपात कृत्रिम बुद्धिमत्ता.. जसे देवर्षी नारद हे विश्वातील पहिले संवाददाता बनून सत्य व वार्ता यांचा प्रसार सर्व लोकांत करीत होते, त्याचप्रमाणे आज कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) पत्रकारांसाठी एक दैवी शस्त्र ठरले आहे.
आता पत्रकाराला कोणत्याही अधिकाऱ्याला विचारण्याची गरज नाही की,
“आपण जनतेबद्दल कोणती कर्तव्ये पार पाडणे बंधनकारक आहे?
“जनसुनावणीत कलेक्टरने कोणते उत्तर द्यायला हवे?”
कारण पत्रकार आता फक्त काही क्षणांत आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपवरून AI कडून ही सर्व माहिती मिळवू शकतो. घटनात्मक तरतुदी, सरकारी अधिसूचना, न्यायालयीन निर्णय आणि कायदेशीर मते हे सर्व काही आता तत्काळ उपलब्ध आहे.
प्रशासनासाठी स्पष्ट संदेश
प्रशासनाने हे समजून घ्यायला हवे की आता पत्रकारांना “फसवणे” शक्य नाही.
कोणत्याही अधिकाऱ्याची टाळाटाळ किंवा बेकायदेशीर भूमिका क्षणातच उघड होऊ शकते. एवढेच नाही, तर त्याचा परिणाम त्यांच्या वार्षिक गोपनीय अहवालावर (ACR) देखील होऊ शकतो.
पत्रकारिता आता फक्त प्रश्न विचारणे किंवा रिपोर्ट सादर करणे इतक्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. ती आता AI-सशक्त चेतना बनली आहे, जी शासनाला पारदर्शकतेकडे आणि जनतेच्या सबलीकरणाकडे घेऊन जात आहे.
पत्रकारितेचा नवयुग
आज पत्रकाराचे अस्त्र-शस्त्र केवळ लेखणी, कॅमेरा आणि माईक नाही. त्याच्या हाती आता AI चे ब्रह्मास्त्र देखील आहे —
जे त्याच्या शोधक क्षमतेला अनेक पटीने वाढवते,त्याला तात्काळ कायदेशीर संरक्षण प्रदान करते,शासन-प्रशासनाला पारदर्शक व जबाबदार बनवते,
आणि सामान्य नागरिकांना न्यायाच्या दिशेने जलद गतीने नेते.
पत्रकारितेचे हे नवीन युग केवळ माहितीच्या आदानप्रदानाला वेगवान करत नाही, तर त्याला न्याय आणि सत्याची संजीवनी देखील प्रदान करत आहे.
विश्वव्यापी संदेश
कृत्रिम बुद्धिमत्तेने पत्रकारितेला अभूतपूर्व आयाम दिले आहेत. आता पत्रकार एकटा नाही, असहाय नाही.
त्याच्या हातात ती शक्ती आहे जी अन्याय आणि भ्रष्टाचाराची झोप उडवू शकते.
जेव्हा सत्य आणि तंत्रज्ञान एकत्र येऊन कार्य करतात, तेव्हा कोणताही अन्याय टिकू शकत नाही. हा संदेश आज फक्त भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी आहे.
✍️ डॉ. नवीन आनंद जोशी
Belgaum Varta Belgaum Varta