तामिळनाडूतील करूर येथे टीम विजय कळघमच्या रॅलीत चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर आली आहे. या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत 35 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच अनेक कार्यकर्ते बेशुद्ध पडले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच काही बेशुद्ध मुलांनाही रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आज (शनिवार) तमिळगा वेत्री कळघम (TVK) चे प्रमुख आणि अभिनेता विजय यांच्या नेतृत्वाखाल रॅली आयोजित करण्यात आली होती. यात चेंगराचेंगरी झाली आहे. यात ज्यामुळे काही मुलांसह अनेक लोक बेशुद्ध पडले आहेत. विजय रॅलीला संबोधित करत असताना मोठी गर्दी जमली होती. मात्र काही काळामुळे गर्दी अनियंत्रित झाली आणि चेंगराचेगली झाली. यात आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली असून अनेकजण जखमी झाले आहेत.
पक्षाच्या कार्यकर्त्यांसह अनेक लोक बेशुद्ध
चेंगराचेंगरीत अनेक लोक बेशुद्ध पडले आहेत. यात पक्षाच्या कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. यामुळे रॅलीत मोठा गोंधळ उडाला. यानंतर विजय यांनी त्यांचे भाषण थांबवले आणि रॅलीसाठी तयार केलेल्या बसमधून पाण्याच्या बाटल्या खाली फेकल्या. रॅलीच्या ठिकाणी प्रचंड गर्दी होती. त्यामुळे रुग्णवाहिकांना घटनास्थळी पोहोचण्यास अडचण येत होती. मोठ्या प्रयत्नांनंतर बेशुद्ध लोकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
जखमींना वैद्यकीय सेवा पुरविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
या घटनेची दखल तामिळनाडू सरकारनेही घेतली आहे. करूर येथील रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीबाबत तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ‘करूरमधून आलेली बातमी चिंताजनक आहे. मी माजी मंत्री व्ही. सेंथिलबालाजी, मंत्री सुब्रमण्यम आणि जिल्हाधिकाऱ्यांना गर्दीत बेशुद्ध पडलेल्या आणि रुग्णालयात उपचार घेणाऱ्या नागरिकांना त्वरित वैद्यकीय सेवा पुरविण्याचे निर्देश दिले आहेत. मी शेजारच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्याचे मंत्री अनबिल महेश यांनाही युद्धपातळीवर सर्व आवश्यक मदत देण्यास सांगितली आहे. मी जनतेला डॉक्टर आणि पोलिसांना सहकार्य करण्याची विनंती करतो.’
Belgaum Varta Belgaum Varta