Tuesday , March 3 2026
Breaking News

थलपती विजय चेंगराचेंगरीच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २० लाख देणार!

Spread the love

 

दाक्षिणात्य अभिनेता थलपती विजयची तामिळनाडूमधील करूर या ठिकाणी शनिवारी रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीला हजारो नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, या रॅली दरम्यान चेंगराचेंगरी झाली आणि तब्बल ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच जवळपास १०० जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तामिळनाडू सरकारने प्रत्येकी १० लाखांची मदत जाहीर केली आहे.

त्यानंतर आता थलपती विजयनेही मोठी घोषणा करत चेंगराचेंगरीमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २० लाख देणार असल्याचे सांगितले आहे. थलपती विजयने या घटनेबाबत बोलताना दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या ३८ जणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २० लाख रुपयांची भरपाई आणि जखमी झालेल्यांना प्रत्येकी २ लाख रुपये देणार असल्याचे थलपती विजयने सांगितले आहे.

थलपती विजय घटनेबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाला की, “जी घटना घडली त्या घटनेमुळे मला अतीव वेदना झाल्या आहेत. माझ्या मनाला वेदना होत आहेत. मी माझ्या वेदना आणि शोक शब्दांमध्ये व्यक्त करु शकत नाही. करुरमध्ये ज्यांचा मृत्यू झाला त्या सगळ्या भावांना आणि बहिणींना मी आदरांजली वाहतो. मी त्यांच्या कुटुंबांबाबत सहानुभूती व्यक्त करतो.” असं म्हणत थलपती विजयने प्रतिक्रिया दिली आहे.

तामिळनाडू सरकारची मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तमिळनाडू सरकारने या घटनेची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय तपास आयोग नेमला आहे. सेवानिवृत्त न्यायाधीश जस्टिस अरुणा जगदीसन या आयोगाच्या अध्यक्ष असतील.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *