

मुंबई : प्रसिद्ध विनोदी अभिनेते असरानी यांचे आज निधन झाले. ते बऱ्याच काळापासून आजारी होते. आज दुपारी ३ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. असरानी यांचे पूर्ण नाव गोवर्धन असरानी होते. अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज २० ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता त्यांचे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते.
असरानी यांना फुफ्फुसांची समस्या होत होती. ते गेल्या पाच दिवसांपासून आरोग्य निधी रुग्णालयात उपचार घेत होते. दरम्यान असरानी यांचे मॅनेजर बाबूभाई थिबा यांनी असरानी यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. असरानी यांची प्रकृती अनेक दिवसांपासून खराब होती आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, असं थिबा यांनी माध्यमांना सांगितले.
असरानी यांच्या अचानक निधनाने चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत शेकडो चित्रपटांमध्ये काम केले आहे. असरानी यांचा जन्म १ जानेवारी १९४१ रोजी जयपूर येथे झाला. त्यांनी जयपूरमधील सेंट झेवियर्स स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी राजस्थान कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. १९६७ मध्ये ‘हरे कांच की चुडियाँ’ या चित्रपटाद्वारे असरानी यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं.
Belgaum Varta Belgaum Varta