
फलोदी : राजस्थानच्या फलोदी जिल्ह्यातील माटोडा परिसरातील भारतमाला एक्सप्रेसवेवर रविवारी संध्याकाळी उशिरा एक भीषण अपघात झाला. जोधपूरमधील सुरसागर येथील रहिवासी असलेले अठरा जण एका टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये बिकानेरमधील कोलायत मंदिरातील देवदर्शनाहून परतत होते. हनुमान सागर चौकाजवळ, भरधाव वेगाने येणारा टेम्पो ट्रॅव्हलर अचानक उभ्या असलेल्या ट्रकला धडकला. या अपघातात अठरा जणांचा जागीच मृत्यू झाला.
फलोदीचे पोलिस अधीक्षक कुंदन कंवरिया यांनी मृतांच्या संख्येची पुष्टी केली. “पंधरा जणांचा जागीच मृत्यू झाला. तिघांना जखमींना तातडीने ओसियन रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथून त्यांना ग्रीन कॉरिडॉरद्वारे जोधपूरला रेफर करण्यात आले. धडक इतकी तीव्र होती की टेम्पो ट्रॅव्हलर पूर्णपणे चिरडला गेला.
टेम्पो ट्रॅव्हलरच्या सीट आणि धातूमध्ये अनेक मृतदेह अडकले होते आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांना आणि स्थानिकांना खूप संघर्ष करावा लागला. फलोदी पोलिस स्टेशनचे अधिकारी अमनाराम म्हणाले, “सर्व मृत आणि जखमी जोधपूरच्या सुरसागर भागातील रहिवासी होते. ते कोलायतला भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांसह परतत होते. पोलिस, एसडीआरएफ आणि मदत पथकांनी घटनास्थळी बचाव कार्य केले.
अपघाताची माहिती मिळताच जोधपूरचे पोलिस आयुक्त ओम प्रकाश माथूर घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. भारतमाला एक्सप्रेसवेवर टेम्पो ट्रॅव्हलरचा वेग जास्त आणि दृश्यमानता कमी असणे ही अपघाताची प्राथमिक कारणे असल्याचे मानले जात आहे, यामुळे चालकाला रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक दिसत नव्हता. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta