नागपूर : राज्यसभेच्या जागांसाठी कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार यावरुन सगळ्याच पक्षात चढाओढ पाहायला मिळत आहे. काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची जोरदार चर्चा रंगली आहे. काँग्रेसकडून उमेदवारीची माळ प्रकाश आंबेडकर यांच्या गळ्यात पडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. उमेदवारी देऊन काँग्रेस प्रकाश आंबेडकर यांच्याशी जवळीक साधण्याचे प्रयत्न करणार असल्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे.
प्रकाश आंबेडकर आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांची 15 दिवसांपूर्वी भेट झाली होती. या भेटीमध्ये स्थानिक पातळीच्या निवडणुकीत एकत्र येण्याबाबत त्यांच्यामध्ये प्राथमिक स्तरावर चर्चा झाल्याचं समजतं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रादेशिक नेतृत्त्वाशी बोलणार नाही, पक्षश्रेष्ठींसोबतच याबाबत बोलतील अशी प्रकाश आंबेडकर यांची कायमच भूमिका राहिलेली आहे. काँग्रेसची जी मोठी व्होटबँक आहे, त्यांच्या भावना आंबेडकर आणि आंबेडकर कुटुंबियांशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांशी आघाडी झाली तर एक मोठी व्होटबँक आपल्याकडे वळेल, असं काँग्रेसचं मत आहे. यामुळेच काँग्रेस प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेची जागा देऊ शकते का, अशी चाचपणी सुरु असल्याचं कळतं.
Belgaum Varta Belgaum Varta