
मोलम (गोवा) : मोलम (गोवा) तपासणी नाक्यावर शनिवारी रात्री सुमारे 8:45 वाजताच्या सुमारास गोव्याकडे बेकायदेशीररित्या गोमांस वाहतूक करणारी टाटा कंपनीची झायलो कार पकडण्यात आली. या वाहनातून शेकडो किलो गोमांसाची वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे.
कारवाईदरम्यान एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले, तर दुसरा संशयित पळून गेला असून जंगलात शिरला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार जीए 07 ई 1582 क्रमांकाची झायलो कार गोव्याच्या दिशेने जात असताना मोलम तपासणी नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी संशयावरून वाहन थांबवले. तपास केल्यावर वाहनात मोठ्या प्रमाणात गोमांस आढळले. तत्काळ कार व ताब्यातील संशयिताला पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
घटनेची माहिती मोलम गावातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना समजताच ते मोठ्या संख्येने तपासणी नाक्यावर जमा झाले. त्यानंतर बजरंग दलाचे कार्यकर्ते, पोलीस व तपासणी नाक्यावरील कर्मचारी यांनी एकत्रितपणे फरार संशयिताचा शोधमोहीम सुरू केली. मात्र रात्री उशिरापर्यंत तो सापडू शकला नाही.
या प्रकरणी पुढील तपास मोलम (गोवा) पोलीस करीत असून फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न तीव्र करण्यात आले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta