
मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांत दोषी; न्यायालयाचा मोठा निर्णय
ढाका : माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने (ICT-BD) सोमवारी मोठा निर्णय दिला आहे. मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांत शेख हसीना यांना न्यायालयाने दोषी ठरवले असून थेट मृत्युदंडाची (फाशीची शिक्षा) शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे शेख हसीना यांचे समर्थक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.
शेख हसीना यांना न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्यामुळे त्यांचे समर्थक आक्रमक झाले असून बांगलादेशामध्ये तणाव वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. वृत्तानुसार, शेख हसीना यांच्यावर निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिल्याचा ठपका ठेवत त्यांना दोषी ठरवण्यात आलं असून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनलने हा निर्णय दिला आहे.
या प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरणाने शेख हसीना यांच्या विरोधात तब्बल ४५८ पानांचा निकाल दिला आहे. त्यामध्ये शेख हसीना यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. दरम्यान, शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्याच्या नंतर त्यांच्या समर्थकांनी हिंसा किंवा जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला तर थेट गोळीबार करण्याचे आदेश जारी करण्यात आले असल्याचंही वृत्तात म्हटलं आहे. या अनुषंगाने ठीक ठिकाणी लष्कराच्या तुकड्या आणि मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta