
अहमदाबाद : रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला असून मृतांमध्ये वडील, एका डॉक्टर आणि एक परिचारिका यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवजात बाळाला अरवलीहून अहमदाबादला नेत असताना हा भीषण अपघात घडला. मोडासातील राणा सय्यदजवळ रूग्णवाहिकेला आग लागली. या आगीत चोघांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
सोमवारी रात्री उशिरा रूग्णावाहिकेला आग लागली. रूग्णवाहिकेत अचानक आग लागल्यामुळे काही क्षणात भडका उडाला. पेट्रोल पंपाजवळून जात असताना रूग्णावाहिकेने पेट घेतला. भीषण आगीमुळ रूग्णावाहिकाची राख झाली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच आग विझवण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाने आग विझवली, पण सर्वांचे जीव वाचवता आले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ही रूग्णावाहिका अहमदाबादच्या ऑरेंज हॉस्पिटलची असल्याची माहिती आहे.
Belgaum Varta Belgaum Varta