Tuesday , March 3 2026
Breaking News

१० व्यांदा घेतली नितीश कुमारांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ!

Spread the love

 

पटना : विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहारमध्ये एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १० व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नितीश कुमार यांच्यासोबत सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. बिहारच्या गांधी मैदानावर हा शपथविधी सोहळा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह एनडीएचे वरिष्ठ नेते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले आहेत.
एनडीए सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि इतरांसह एनडीएचे वरिष्ठ नेते पाटण्यातील गांधी मैदानावर उपस्थित आहेत. भोजपुरी स्टार अभिनेता-गायक मनोज तिवारी आणि पवन सिंह देखील यावेळी उपस्थित आहेत. या शपथविधी सोहळ्याला प्रचंड गर्दी झाली आहे

नितीश कुमार यांच्यासोबत कुणी-कुणी मंत्रिपदाची शपथ घेतली

– सम्राट चौधरी – उपमुख्यमंत्री

– विजय कुमार सिन्हा – उपमुख्यमंत्री

– मंगल पांडे

– डॉ. दिलीप जयस्वाल

– नितीन नबीन

– रामकृपाल यादव

– संजय सिंग ‘टायगर’

– अरुण शंकर प्रसाद

– सुरेंद्र मेहता

– नारायण प्रसाद

– राम निषाद

– लखेंद्र पासवान

– श्रेयसी सिंग

– डॉ. प्रमोदकुमार चंद्रवंशी (आमदार)

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *