
लातूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. लातूर येथील देवघर या निवासस्थानी त्यांनी आज सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. ते दीर्घ आजाराने त्रस्त होते. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शिवराज पाटील चाकूरकर हे लोकसभेचे सभापती आणि विविध केंद्रीय मंत्रीपदांवर कार्यरत होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत देशासाठी अनेक प्रतिष्ठित पदे भूषवली आणि त्यांनी देशातील संवैधानिक प्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावली होती. शिवराज पाटील हे लातूरमधील चाकूर येथील प्रभावी काँग्रेस नेते होते. त्यांनी लातूर लोकसभा मतदारसंघातून ७ वेळा विजय मिळवला होता.
Belgaum Varta Belgaum Varta