Tuesday , March 3 2026
Breaking News

कॉ. पानसरे हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी समीर गायकवाड यांचा मृत्यू

Spread the love

 

सांगली : ज्येष्ठ पुरोगामी नेते आणि विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी समीर गायकवाड (वय ४३) याचा आज, २० जानेवारी २०२६ रोजी सांगलीत मृत्यू झाला. सांगलीच्या शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) उपचार सुरु होते. प्राथमिक माहितीनुसार, हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

समीर गायकवाड गेल्या काही काळापासून जामिनावर बाहेर होता आणि सांगलीतील विकास चौक परिसरात आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होता. काल मध्यरात्रीच्या सुमारास त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. कुटुंबीयांनी त्याला तातडीने सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, पहाटेच्या सुमारास उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *