Tuesday , March 3 2026
Breaking News

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love

 

उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस खोल दरीत कोसळली. या अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला. तर ३४ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही बस बैताडीहून बझांगला जात होती. नेपाळमधईल बैताडी येथे या बसला अपघात झाला. या अपघातामध्ये जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.

गुरूवारी मध्यरात्री ही अपघाताची घटना घडली. बैताडीच्या पुरचुनी नगरपालिकेतील सात भावने गावातून बझांगमधील सुनकुडा येथे ही बस चालली होती. नवरीला घेऊन बसने वऱ्हाडी निघाले होते. पण वाटेत त्यांच्यावर काळाने घाला घातला. पुरचुनीच्या बडगाव वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस थेट १५० फूट खोल दरीत कोसळली.

हा अपघात झाला त्यावेळी बसमधील वऱ्हाडी झोपेत होते. बस कोसळताना जोरात आवाज झाल्यामुळे आसपासच्या गावांना अपघाताची माहिती कळाली. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिस आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी आली. स्थानिकांच्या मदतीने त्यांनी बचावकार्य करत अनेकांचे प्राण वाचवले.
या अपघातामध्ये या अपघातात केशव राज जोशी (४० वर्षे), अशोक राज जोशी (१३ वर्षे), बसंत राज जोशी (३५ वर्षे), बिष्णू दत्त जोशी (४१ वर्षे), नरेश राज जोशी (४२ वर्षे), बिशन दत्त जोशी (१७ वर्षे), दीपक जोशी (२८ वर्षे), किशन जोशी (४६ वर्षे), मोहन देव भट्ट (६० वर्षे), बसंत राज रतला (४० वर्षे), पुष्पा अवस्थी (४० वर्षे) आणि सुशील जोशी यांचा मृत्यू झाला.

About Belgaum Varta

Check Also

कॉ. पानसरे हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी समीर गायकवाड यांचा मृत्यू

Spread the love  सांगली : ज्येष्ठ पुरोगामी नेते आणि विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *