नवी दिल्ली : वाराणसीतील ज्ञानवापी मशीद प्रकरणाचा खटला आता वाराणसीतील जलदगती न्यायालयाकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. बुधवारी सुनावणीपूर्वी डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांनी हे प्रकरण डिव्हीजन फास्ट ट्रॅक कोर्ट महेंद्र कुमार पांड्ये यांच्याकडे सोपवले. या प्रकरणावर ३० मे रोजी सुनावणी होणार आहे.
शिवलिंगाची पूजा करण्याची मागणी
मंगळवारी दिवाणी न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांच्या न्यायालयात विश्व वैदिक सनातन संघाने याचिका दाखल केली होती. या याचिकेत हिंदूंना मशिदीच्या संकुलात कथितपणे सापडलेल्या शिवलिंगाची पूजा करण्याची परवानगी मागितली होती.
विश्व वैदिक सनातन संघाच्या मागण्या
विश्व वैदिक सनातन संघाने काही मागण्या केल्या आहेत. ज्ञानवापी मशीद परिसरात तात्काळ मुस्लिमांना प्रतिबंध करण्यात यावा. ज्ञानवापीचा संपूर्ण परिसर हिंदूंकडे सोपवण्यात यावा आणि त्या जागी सापडलेल्या शिवलिंगाची पूजा करण्याची परवानगी देण्यात यावी, अशा तीन मागण्या करण्यात आल्या आहेत.