जम्मू : जम्मू काश्मीरमधील बडगम जिल्ह्यात एका ३५ वर्षीय सोशल मीडिया स्टारची दहशतवाद्यांकडून गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या हल्ल्यात महिलेचा १० वर्षाचा भाचा जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर-ए-तोयबाने हा हल्ला केला.
“रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांना घरात घुसून अमरिन भटवर गोळीबार केला. जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं,” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अमरिन भट टिकटॉक तसंच टीव्ही स्टार होती.
अमरिनचा भाचा फरहान जुबैर या हल्ल्यात जखमी झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांना संपूर्ण परिसर सील केला असून हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta