Sunday , September 8 2024
Breaking News

जम्मू-काश्मीर: बारामुल्लात चकमक; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Spread the love

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या बारामूला जिल्ह्यातील सोपोरच्या वारपोरा गावात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तयब्याचे अतिरेकी होते. पोलिसांनी यासंदर्भातील माहिती दिली. मरणाऱ्यामध्ये एका टॉप कमांडरचा समावेश आहे. सुरक्षा बलांना घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारुगोळा सापडला आहे. तसेच अनेक आक्षेपार्ह वस्तू आढळल्या आहेत. सर्च ऑपरेशन सुरु आहे. एएनआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे.
काश्मिरचे आयपीजी विजय कुमार यांनी वृत्त संस्था एएनआयला सांगितलं की, सोपोर चकमकीत दहशतवादी संघटन लष्कर-ए-तयब्बाचे दोन अतिरेकी मारले गेले. यामधील एका दहशतवाद्याचा अनेक हल्ले आणि हत्यांमध्ये सहभाग होता. त्यामुळे सुरक्षा दलांचे हे मोठे यश आहे. वारपोरा गावात काही दहशतवादी लपल्याची सूचना मिळाली होती. त्यानंतर हे ऑपरेशन सुरु करण्यात आले होते.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी सोपोरच्या वारपोरा भागात घेराबंदी केली. त्यानंतर सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले. सुरक्षा दलांना पाहताच एका घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलांनी गोळीबार केला. त्यामुळे चकमक सुरु झाली. दहशतवादी एका घरात लपले होते. दरम्यान, गेल्या आठवड्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी लष्कर ए तयब्बाच्या टॉप कमांडरसह दोघांचा खात्मा केला होता.

About Belgaum Varta

Check Also

सिक्कीममध्ये सैन्य दलाचे वाहन दरीत कोसळून ४ जवानांचा जागीच मृत्यू

Spread the love  नवी दिल्ली : सिक्कीमध्ये गुरुवारी भारतीय सैन्य दलाचे वाहन ७०० ते ८०० …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *