नवी दिल्ली : व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर दरात 198 रुपयांची कपात करण्यात आली आहे. हा नवीन दर आजपासून लागू होईल. या दर कपातीमुळे 19 किलो वजनाच्या गॅस सिलिंडरचा दर दिल्लीत 2,021 रुपयांवर आला आहे.
व्यावसायिक गॅस सिलिंडर 198 रुपयांनी स्वस्त झाल्याने रेस्टॉरंट्स, भोजनालये, चहाचे स्टॉल्स आणि इतरांना दिलासा मिळाला आहे. याआधी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 19 किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. 1 मे रोजी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 102.50 रुपयांनी वाढून 2,355.50 रुपयांवर पोहोचली होती. एप्रिल आणि मार्चमध्येही 19 किलो व्यावसायिक एलपीजीची किमती अनुक्रमे 250 रुपये आणि 105 रुपयांनी वाढली होती.
याआधी घरगुती एलपीजी सिलिंडर जोडणी महागली आहे. यामुळे 14.2 किलो वजनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या नवीन जोडणीसाठी ग्राहकांना 2 हजार 200 रुपये मोजावे लागत आहेत. जोडणी शुल्कातील ही वाढ 770 रुपयांची आहे.
Belgaum Varta Belgaum Varta