नवी दिल्ली : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. १४.२ किलो वजनाचा घरगुती वापराचा गॅस सिलिंडरचा दर ५० रुपयांनी वाढला आहे. यामुळे दिल्लीत या सिलिंडरचा दर आता १,०५३ रुपयांवर पोहोचला आहे. ही दरवाढ आजपासून लागू झाली आहे. तर ५ किलो वजनाचा घरगुती गॅस सिलिंडर १८ रुपयांनी महागला आहे. दरम्यान, १९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ८.५० कपात करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta