नवी दिल्ली : मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रीपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची त्यांनी भेट घेतली. दरम्यान, नक्वी यांना लवकर मोठी जबबादारी देण्यात येईल, अशी चर्चा भाजप वर्तुळात सुरु आहे. मात्र याबाबत नक्वी यांनी अधिकृतपणे विधान केलेले नाही.
नक्वी हे राज्यसभा सदस्य होते. त्यांचा कार्यकाल ७ जुलै रोजी संपणार होता. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने त्यांना पुन्हा संधी दिली नव्हती. आता त्यांच्यावर कोणती नवीन जबाबदारी सोपविण्यात येणार याची चर्चा भाजप वुर्तळात रंगली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta