Tuesday , March 3 2026
Breaking News

भारतात मंकीपॉक्सची एन्ट्री!; केरळमध्ये आढळला मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण

Spread the love

 

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून मंकीपॉक्स विषाणूचा जगभर धुमाकुळ घातला आहे. आतापर्यंत 20 हून देशांमध्ये मंकीपॉक्स विषाणूचा शिरकाव झाला आहे. आता केरळच्या कोल्लममध्ये देशातील पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला आहे. केरळच्या आरोग्यमंत्री वीना जॉर्ज यांनी ही माहिती दिली आहे.

भारतात केरळच्या कोल्लम येथे मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला आहे. टीवीएम मेडिकल कॉलेजच्या एक रुग्णामध्ये मंकीपॉक्सची लक्षणे दिसून आली. त्यानंतर चाचण्या केल्या असता मंकीपॉक्स झाल्याचे निष्पन्न झाले. देशात पहिला रुग्ण आढळला तरी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे केरळच्या आरोग्यमंत्री वीना जॉर्ज म्हणाल्या. रुग्णाच्या आई-वडिलांना तिरुअनंतपुरम येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले आहे.

केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज म्हणाल्या, परदेशातून भारतात परतलेल्या एका व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सची लक्षणे दिसून आली त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णाला ताप आणि संक्रमित व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर पुरळ आले आहेत. त्यानंतर रुग्णाचे नमुने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे पाठवले. ज्या व्यक्तीमध्ये लक्षणे दिसली तो व्यक्ती यूएईमधील मंकीपॉक्सची लागण झालेल्या एका रुग्णाच्या संपर्कात आला होता.

27 देशात मंकीपॉक्सचे 800 रुग्ण

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या माहितीनुसार सध्या 27 देशात मंकीपॉक्सचे आतापर्यंत 800 रुग्ण आढळले आहेत.

मंकीपॉक्सची लक्षणं काय?

तज्ज्ञांच्या मते ‘मंकीपॉक्स’ हा एक दुर्मिळ विषाणू आहे. ताप आलेल्या व्यक्तीमध्ये जे सामान्य लक्षणे दिसतात, तीच लक्षणे यात दिसून आली आहेत. यामध्ये संक्रमित व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर आणि चेहऱ्यावर पुरळ दिसू लागते. याशिवाय ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा अशी लक्षणे दिसू शकतात.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *