Sunday , December 22 2024
Breaking News

इंदूरहून जळगावकडे येणारी एसटी बस नर्मदा नदीत कोसळली; 13 जणांचा मृत्यू

Spread the love

 

इंदूर : मध्य प्रदेशातील धारमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. इंदूरहून जळगावमधील अमळनेरकडे येणारी एसटी बस नर्मदा नदीत कोसळली. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 12 ते 15 जण बेपत्ता झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. अपघातग्रस्त बसला क्रेनच्या मदतीने नदीबाहेर काढण्यात आले आहे.
एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस ही जळगावमधील अमळनेर येथे येणार होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एसटीचे अधिकारीदेखील घटनास्थळी रवाना झाले असल्याची माहिती चन्ने यांनी दिली.
मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली दखल
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितलं की, इंदूरहून येणार्‍या बस अपघाताची माहिती मुख्यमंत्री यांनी घेतली आहे. आम्ही अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या दुःखात सहभागी आहोत. मुख्यमंत्री याबाबात अधिक माहिती घेत आहेत.
दरम्यान, एसटी बसचा अपघात झाल्याची माहिती समोर आल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी घटनास्थळी एसडीआरएफला दाखल होण्याचे निर्देश दिले. मदत आणि बचाव कार्य तातडीने सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मुख्यमंत्री चौहान हे इंदूर जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहेत.

About Belgaum Varta

Check Also

सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन काळाच्या पडद्याआड

Spread the love  नवी दिल्ली : २०२४ वर्ष संपता संपता एक दु:खद बातमी हाती आली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *