तिरुअनंतपुरम : भारतात मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण सापडला असून केरळमधील कन्नूमरमध्ये 31 वर्षाच्या युवकाला त्याची लागण झाल्याचं समोर आलं आहे. हा व्यक्ती 13 जुलै रोजी दुबईहून भारतात परतला आहे.
केरळमध्ये मंकीपॉक्स आजाराचा दुसरा रुग्ण सापल्याने आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. या रुग्णाला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृत्ती सध्या स्थिर असल्याची माहिती केरळच्या आरोग्यमंत्री विना जॉर्ज यांनी दिली आहे.
या आधी 14 जुलै रोजी केरळमध्येच मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला होता. यूएईवरून आलेल्या 35 वर्षीय व्यक्तीला त्याची लागण झाल्याचं समोर आलं होतं. आता दुसरा रुग्ण सापडला आहे. केरळच्या आरोग्य मंत्रालयाने याबाबत खबरदारीचे सर्व उपायांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले असून 14 जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार सध्या 27 देशात मंकीपॉक्सचे आतापर्यंत 800 रुग्ण आढळले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta