Friday , November 22 2024
Breaking News

रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती

Spread the love

 

कोलंबो : श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदी निवड रानिल विक्रमसिंघे यांची झाली आहे. विक्रमसिंघे 134 मतांनी विजयी झाले आहेत. रानिल विक्रमसिंघे यांच्या रुपात श्रीलंकेला नवे राष्ट्रपती मिळाले आहेत. श्रीलंकेमध्ये आज राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक पार पडली आहे. राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत प्रबळ दावेदार मानले जाणारे साजिथ प्रेमदासा शर्यतीत बाहेर पडल्यानंतर राष्ट्रपतीपदासाठी रानिल विक्रमसिंघे विरुद्ध डलास अलाहाप्पेरुमा यांच्यात संघर्ष होता. रानिल विक्रमसिंघे यांच्या विरुद्ध एसएलपीपी खासदार डलास अलाहाप्पेरुमा हे सत्ताधारी पक्षाचे उमेदवार होते. विक्रमसिंघे यांनी डलास अलाहाप्पेरुमा यांचा पराभव केला आहे.
रानिल विक्रमसिंघे बहुमतांनी विजयी
श्रीलंका सध्या भीषण आर्थिक संकटाचा सामना करत आहे. तत्कालीन राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी पलायन करून राजीनामा दिल्यानंतर रानिल विक्रमसिंघे यांच्याकडे कार्यवाहक राष्ट्रपतीपदाची जबाबदारी होती. पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यवाहक राष्ट्रपतीपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर आज राष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडली. यामध्ये रानिल विक्रमसिंघे यांनी 134 मतांनी विजय मिळवला आहे. 225 खासदारांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत मतदान केलं. विजयासाठी उमेदवाराला 113 हून अधिक मतं मिळवणं आवश्यक होतं. या निवडणुकीत रानिल विक्रमसिंघे 134 मतं मिळवत बहुमत मिळवत राष्ट्रपतीपदी विराजमान झाले आहेत.
भारताच्या मदतीने श्रीलंकेचा संकटातून मार्ग काढण्याचा प्रयत्न
श्रीलंकेत आर्थिक संकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे, तेव्हापासून भारत हा एकमेव देश आहे जो श्रीलंकेला सातत्याने मदत करत आहे. यामुळे श्रीलंकेतील जनता आणि सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारला सातत्याने आवाहन करत आहे. बदलत्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर भारताने आपली भूमिका बदलू नये, असं आवाहन श्रीलंकेनं केलं आहे. कारण भारताच्या मदतीने श्रीलंका या संकटातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे.

About Belgaum Varta

Check Also

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई; चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा

Spread the love  जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी सुरक्षा दलाच्या जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *