Wednesday , December 10 2025
Breaking News

लखनऊ येथे डबल डेकर बसचा भीषण अपघात; आठ ठार, १६ जखमी

Spread the love

लखनऊ : उत्तर प्रदेशात एका डबल डेकर बसला भीषण अपघात झाल्याचं वृत्त असून यामध्ये ८ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १६ जण जखमी झाले आहेत. पुर्वांचल एक्स्प्रेसवेवर सोमवारी हा अपघात झाला. यामध्ये अपघातग्रस्त डबल डेकर बस हायवेच्या बाजूला उभ्या असलेल्या दुसऱ्या डबल डेकर बसवर जाऊन जोरात आदळली. यामध्ये भरधाव वेगात असलेल्या बसचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

पोलीस अधिकारी मनोज पांडे म्हणाले, अपघातग्रस्त बस ही बिहारमधील सीतामढी येथून आली होती. जी नरेंद्रपूर मद्रहा गावाजवळ हायवेच्या बाजूला उभ्या असलेल्या दुसऱ्या एका बसवर जाऊन आदळली. यामध्ये ८ प्रवाशांचा मृत्यू झाला असून त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. तर जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. तर जे गंभीर आहेत त्यांना लखनऊच्या ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आलं आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघातातील मृतांप्रती दुःख व्यक्त केलं असून तसेच जखमींना व्यवस्थित उपचार मिळतील याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

रूग्णवाहिकेने घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू

Spread the love  अहमदाबाद : रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *