इजिप्तमधील गिझा शहरात आज (दि.१४) एका चर्चमध्ये लागलेल्या आगीत ४१ जणांचा मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश लहान मुले आहेत. गंभीर जखमींची संख्या पाहता मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त हाेत आहे.
इम्बाबा परिसरातील कॉप्टिक अबू सिफिन चर्चमध्ये पाच हजारांहून अधिक जण रविवारच्या प्रार्थेनेनिमित्त जमले होते. यावेळी शॉर्टसर्किट झाल्याने आग लागण्यात असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ही आग चर्चच्या प्रवेशद्वाराजवळ लागल्याने लोकांना बाहेर पडण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या, यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत बहुतांश मृत्यू झाल्याचे सुरक्षा रक्षकांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta