नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षावर आज होणारी सुनावणी आता आणखी लांबणीवर पडली आहे. मागील सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणी २२ ऑगस्ट रोजी होईल असं सांगितल होतं. मात्र, आज होणारी सुनावणी २३ ऑगस्टला होणार आहे. त्रिसदस्यीय खंडपीठातले एक न्यायमूर्ती आज उपलब्ध नसल्यामुळे ही सुनावणी लांबणीवर गेल्याचे सांगण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाची मुदतही २३ ऑगस्टला संपणार
सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी ४ ऑगस्टला शेवटची सुनावणी घेण्यात आली होती. त्यानंतर तिसऱ्यांदा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. शिवसेना कुणाची या मुद्द्यावर आता निवडणूक आयोगातही कार्यवाही सुरु आहे. उद्धव ठाकरे गटाने कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ मागितला होता. पण आयोगानं दोन आठवड्यांचाच वेळ दिला आहे. २३ ऑगस्टला याची मुदत संपत असून सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी देखील २३ ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे.
Belgaum Varta Belgaum Varta