मोरादाबाद : उत्तर प्रदेशमधील मोरादाबाद जिल्ह्यात लग्नाची तयारी सुरू असलेल्या तीन मजली इमारतीत आग लागल्याची घटना घडली. या आगीत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग नियंत्रणात आणली. स्थानिकांनीही मदत कार्याला हातभार लावत सात नागरिकांना सुरक्षित बाहेर काढलं.
मोरादाबादचे न्यायदंडाधिकारी शैलेंद्र कुमार सिंह म्हणाले, मोरादाबादमधील तीन मजली इमारतीत आग लागल्याने पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर सात लोक जखमी झाले आहेत. एकाच कुटुंबातील सदस्य या इमारतीत राहत होते. अग्निशमन दल आगीच्या कारणाचा तपास करत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta