Wednesday , March 4 2026
Breaking News

भक्ताला सेवा देण्यास विलंब; तिरुपती मंदिराला 50 लाखांचा दंड

Spread the love

 

तामिळनाडू : तिरुपती मंदिर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरला आहे. भक्ताला सेवा देण्यासाठी विलंब तिरुपती मंदिराला भोवला आहे. वस्त्रालंकार सेवा देण्यासाठी 14 वर्षे वाट पाहायला लावल्याने तिरुपती मंदिराला 50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तामिळनाडूच्या सलेम इथल्या ग्राहक न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
’…अन्यथा 50 लाख रुपये भरपाई द्या’
ग्राहक न्यायालयाने तामिळनाडू येथील तिरुमला तिरुपती देवस्थानाला भक्ताला 14 वर्षे वाट पाहण्यासाठी 50 लाख रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार भक्ताला वस्त्रलंकार सेवेसाठी नवीन तारीख देण्यात यावी किंवा वर्षभरात 50 लाख रुपयांची भरपाई द्यावी. एका भक्ताने तिरुपती देवस्थानाविरोधात ग्राहक न्यायालयात खटला दाखल केला होता. असा खटला दाखल करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
नक्की काय आहे प्रकरण?
भक्त के. आर. हरी भास्कर यांनी वस्त्रालंकार सेवेसाठी 14 वर्षांआधी म्हणजे 2006 साली बुकींग केली होती. कोरोना काळात तिरुपती मंदिर 80 दिवसांसाठी बंद होतं. त्यामुळे मंदिरातील वस्त्रालंकारासह सर्व सेवा बंद होत्या. त्यानंतर तिरुमाला तिरुपती देवस्थानानं भक्त हरी भास्कर यांना अधिकृत निवेदन पाठवत विचारणा केली होती की त्यांना व्हीआयपी ब्रेक दर्शनासाठी नवीन स्लॉट हवा आहे की परतावा. यावर भास्कर यांनी देवस्थानाला वस्त्रलंकार सेवेसाठी कोणत्याही तारखेची बुक देण्यास सांगितलं होतं.
हरी भास्कर यांची ग्राहक न्यायालयात धाव
मात्र त्यानंतर देवस्थानाने वस्त्रलंकार सेवेसाठी नवीन तारीख देता येणार नसल्याचे सांगत त्यांना परतावा घेण्यास सांगितला. यानंतर भक्त के. आर. हरी भास्कर यांनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली. यावर न्यायालयाने भक्ताच्या बाजूने निकाल देत तिरुपती देवस्थानाला भक्ताला वस्त्रलंकार सेवेसाठी नवीन तारीख देण्यात यावी किंवा वर्षभरात 50 लाख रुपयांची भरपाई द्यावी, असे आदेश दिले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *