


हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी ’भाजप मुक्त भारत’ असा नारा देत तेलंगणा राष्ट्र समिती राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले.
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात विविध घडामोडी घडत आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे सातत्याने भाजपच्या विरोधात सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र यावे अशी भूमिका मांडत आहेत.
2024 ला बिगरभाजप सरकार आल्यास शेतकर्यांना मोफत वीज
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे सोमवारी निजामाबाद येथे बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. वेगळ्या राज्याच्या आंदोलनापासून प्रेरणा घेऊन ’भाजप मुक्त भारत’ या नार्याखाली टीआरएस राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करेल असे त्यांनी सांगितले. 2024 मध्ये होणार्या लोकसभा निवडणुकीत बिगरभाजप सरकार स्थापन झाल्यास देशभरातील शेतकर्यांना मोफत वीज दिली जाईल, असेही के चंद्रशेखर राव यांनी सांगितले.
टीआरएसची राष्ट्रीय राजकारणात प्रवेशाची तयारी
तेलंगणातील विकासाचे मॉडेल देशभरात लागू करण्यासाठी तेलंगणा राष्ट्र समिती राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करणार असल्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी जाहीर केले आहे. टीआरएस लोकांच्या पाठिंब्याने भारताचा चेहरा बदलेल असेही ते म्हणाले. निजामाबाद हे एक समृद्ध शहर आहे. लोकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आम्ही लवकरच निजामाबादमधून राष्ट्रीय पातळीवरील निवडणूक प्रचाराला सुरुवात करु, असेही के. चंद्रशेखर राव म्हणाले.
Belgaum Varta Belgaum Varta