नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. पुढील सुनावणी मंगळवारी २७ सप्टेंबर रोजी होणार आहे.
या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये सरन्यायाधीश उदय लळीत यांचा समावेश नाही. सत्ता संघर्षावरची महत्त्वाची सुनावणी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, एम आर शाह, कृष्ण मुरारी, हिमा कोहली आणि पी, नरसिंहा यांच्या घटनापीठासमोर पार पडेल.